अण्णांना काय झाले, तर तुम्हाला सोडणार नाही; घनश्याम दरोडेंचा सरकारला इशारा

1962

अहमदनगर, दि. ५ (पीसीबी) – गेल्या सात दिवसापासून अण्णा हजारे यांचे उपोषण चालू आहे. तरी सरकार दखल घेत नाही,  अण्णांना काय झाले, तर मी तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी राज्य सरकारला आज (मंगळवार) दिला. 

घनश्याम यांने राळेगणसिद्धीमध्ये  अण्णांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अण्णांची तब्बेत  खालावत आहे. सरकारने यावर लवकर उपाय शोधून हे उपोषण थांबवावे, अशी मागणी केली.   स्वामीनाथन आयोग लागू करा , शेतकऱ्यांच्या समस्या संपवा. आज कांद्याचा भाव १, २ रुपयांवर आहे, याबाबत निर्णय घ्या, असे दरोडे म्हणाले.

लोकपाल कायदा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, शेतकऱ्यांच्या मालाला दीड पट भाव मिळावा आदी मागण्यासाठी अण्णांनी गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला सुरूवात केली आहे. दरम्यान अण्णांची तब्बेत खालावत चालली आहे. त्यामुळे चिंता व्यकत् केली जात आहे.