अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार होणार

36

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय ९३) यांचे  आज (गुरूवार) सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वाजपेयी यांच्यावर  ११ जूनपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.  वाजपेयी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शुक्रवारी (दि.१७)  भाजपच्या मुख्यालयात ठेवण्यात येणार  आहे. तर शनिवारी (दि. १८) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.