अटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार

80

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात वयाच्या ९३व्या वर्षी देहावसान झाले. वाजपेयी यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने २२ ऑगस्टपर्यंत सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, त्यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी दिल्लीतील राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.