अटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत जबर मारहाण

1988

दिल्ली, दि. १७ (पीसीबी) –  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गेलेले सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना आज (शुक्रवारी) दिल्लीतील दिनदयाल उपाध्याय मार्गावर मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्या व्हिडिओमध्ये काही तरुण स्वामी अग्निवेश यांना मारहाण करताना दिसत आहे.

स्वामी अग्निवेश यांना गेल्या महिन्यात झारखंडमधील पाकूर भागात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अग्निवेश यांनी गोमांस खाण्याच्या समर्थनार्थ तसेच नक्षलवादासंदर्भात केलेल्या विधानांमुळे भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला होता.