अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून जाणा-या दोघांचा मृत्यू

1

देहुरोड़, दि. 6 (पीसीबी) – एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 4) रात्री सव्वा अकरा वाजता देहूरोड ब्रिजवर झाला.

सागर कल्याण डेगळे (वय 21), वैभव रमेश निंबाळकर (वय 22, दोघे रा. चिखली. मूळ रा. ज्योतिबाची वाडी जवळ, ता. बार्शी, जि. सोलापूर) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार पी डी उगले यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सागर आणि वैभव दोघेजण निगडी-देहूरोड या मार्गाने दुचाकी (एम एच 12 / के यु 4222) वरून जात होते. देहूरोड ब्रिजवर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात सागर आणि वैभव गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालक घटनेची माहिती न देता पळून गेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare