अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

61

चाकण, दि. १३ (पीसीबी) – अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्याने जाणा-या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात दोन ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता महाळुंगे ते वराळे रोडवर उघडकीस आला.

कन्हैया शिवकुमार महंतो (वय 20, रा. वराळे, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेश कुमारराव चिटमपल्ले यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ऑगस्ट रोजी दुपारी पाच ते दोन ऑगस्ट रोजी सकाळी सात या कालावधीत महाळुंगे ते वराळे रोडवर विनायक भांगरे यांच्या पोल्ट्री फार्मजवळ हा अपघात घडला आहे. अज्ञात वाहनाने कन्हैया यास जोरात धडक दिली. त्यात कन्हैया याचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare