अजूनही तरुणांना नियुक्त्या न मिळणे दुर्देवी – देवेंद्र फडणवीस

100
मुंबई, दि.२४ (पीसीबी) – मराठा आरक्षण महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६२/२०१८ मधील कलम १८ नुसार मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळावी,  या मागणीसाठी मराठा समाजाचे तरुण आंदोलन करत आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात गेल्या २७ दिवसांपासून सकल मराठा समाज पुरस्कृत एसईबीसी आणि ईएसबीसी उमेदवारांचे आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे.
दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि नितेश राणे यांनी आज आझाद मैदान येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांना संबोधित करताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “मराठा समाजाच्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आम्ही वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर कलम १८ चा समावेश केला. सगळ्या मराठा उमेवारांना नियुक्त्या मिळाव्यात यासाठी कायदे केले. उच्च न्यायालयाने हा कायदा वैध ठरवला. सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती दिली नाही. मात्र, मात्र, अजूनही तरुणांना नियुक्त्या न मिळणे हे दुर्देवी आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.