अजित पवार यांच्याबद्दल योग्य वेळ आल्यावर बोलेन – देवेंद्र फडणवीस

262

मुंबई,दि.२७(पीसीबी) – अजित पवारांनी पाठिंबा दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, अवघ्या तीन दिवसांत या दोन्ही नेत्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल योग्य वेळ आल्यावर बोलेन, असं सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पत्रकारांनी फडणवीसांना अजित पवारांविषयी प्रश्न विचारला होता.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन राज्यात सत्तास्थापन करतील अशी शक्यता निर्माण झाली असताना अनपेक्षितपणे अजित पवारांनी बंड करत भाजपला पाठिंबा दिला. मात्र, तीन दिवसांत पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बहुमताअभावी भाजपला माघार घ्यावी लागली.

WhatsAppShare