अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

317

> देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा देण्याची शक्यता

मुंबई दि.२६ (पीसीबी)- काहीच दिवसापुर्वी राष्ट्रवादीतुन बंड करणारे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन भाजपा सोबत स्थिर सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता, पण आता काही वेळापुर्वीच अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी ३:३० वाजता पत्रकार परिषद घेणार असुन या पत्रकार परिषदेत फडणवीस यांची भुमिका काय असणार आहे याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहिती नुसार देवेंद्र फडणवीस ही राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

WhatsAppShare