अजमेरा वास्तुउद्योगमधील फ्लॅटमध्ये चोरी; पावनेचार लाखांचे दागिने चोरट्यांने केले लंपास

242

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – बंद फ्लॅटच्या दरवाज्याचा कडीकोयंडा उचकटत घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेल्या तब्बल ३ लाख ९२ हजारांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. ही घटना सोमवारी (दि.२०) रात्री साडेनऊ ते मंगळवारी (दि.२१) सकाळी दहाच्या सुमारास अजमेरा वास्तुउद्योग कॉर्नर येथील सागर कोऑपरेटिव सोसायटीतील फ्लॅट नं.५ मध्ये घडली.

याप्रकरणी मदन गणेश कुलकर्णी (वय ६३, रा. फ्लॅट नं.५, सागर कोऑपरेटिव सोसायटी, वास्तुउद्योग कॉर्नर, अजमेरा, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंपरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलकर्णी यांचा अजमेरा वास्तुउद्योग कॉर्नर येथील सागर कोऑपरेटिव सोसायटीतील फ्लॅट नं.५ हा स्वत:च्या मालकीचा आहे. सोमवारी ते त्यांच्या फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले असता काही अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. तसेच घरातील कपाटामध्ये ठेवलेले तब्बल ३ लाख ९२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. पिंपरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.