अजमेरात काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी

44

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी – चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने अजमेरा  कार्यालयात थोर समाजोद्धारक, रयतेचा राजा राजर्षी शाहू महाराजांची १४४ वी जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे व पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मंगल यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी काँग्रेस पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष गुरुदेव लक्ष्मण वैराळ, सचिव आयुष मंगल, सचिव अमर नाणेकर, श्वेता मंगल, सचिव राजेश नायर, एस. टी. कांबळे, नेहा मंगल, मिताली चक्रवर्ती, आयुवीर मंगल, अक्षांश मंगल, जयश्री कननाइके, सुनील पवार आदी उपस्थित होते.