अजब प्रेमाची गजब गोष्ट! सोशल मिडियावरच्या प्रेमाला लागलं वेगळच वळण

72

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – सोशल मीडियाच्या युगात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. आपण अनेक वेळा सोशल मीडियावरुन प्रेम झालेलं ऐकतो. एवढंच काय तर अनेक लोक सोशल मीडियावरच्या ओळखीवरुन लग्न देखील करतात. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीने तरुणीला प्रेमात पाडलं. तसेच त्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार घडले.

एका 25 वर्षांच्या मुलीने सोशल मीडियावर मुलाच्या नावाने अकाऊंट उघडलं. त्यानंतर तिने एका तरुणीला रिक्वेस्ट पाठवली. यातून त्यांची चॅटिंग सुरु झाली आणि असं करता-करता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेमसंबंधांनंतर दोघांमध्ये भेटण्याचं ठरलं. मात्र, भेटल्यानंतर दोघांमध्ये शारीरिक जवळीक निर्माण झाली.

दोघांमध्ये अनेक वेळा सेक्स झाला तरी देखील संबंधित तरुणीला आपला प्रियकर मुलगा नसून मुलगी असल्याचं समजलं नाही. भेटायला जाताना तरुणी मुलगा बनून जायची आणि सेक्स करताना सेक्स टाॅयचा वापर करायची.
दरम्यान, तब्बल दहा वेळा सेक्स झाल्यानंतर मुलीला आपला प्रियकर मुलगा नसून मुलगी असल्याचं समजलं. हे समजताच मुलीने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. संपुर्ण प्रकार ऐकल्यानंतर पोलीस देखील हैराण झाले आणि त्यांनी संबंधित आरोपी मुलीला अटक केली. तसेच न्यायालयाने आरोपी मुलीला 8 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. संबंधित घटना ही लंडनमधील आहे.

WhatsAppShare