अजब चोरी: भोसरीतील कपड्याच्या दुकानातून चोरट्यांनी चोरले पाऊन लाखांचे कपडे

135

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील नवीन जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट आणि अन्य कपडे असा एकूण पाऊन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरु नेला आहे. ही चोरी आज (मंगळवार) सकाळीच्या सुमारास भोसरीतील अॅटीट्युड मेन्स या सखुबाई गवळी उद्यानासमोर असलेल्या दुकानातून उघडकीस आली.  

याप्रकरणी दुकान मालक राजन श्रीकृष्ण सिंग (वय ३०, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीतील सखुबाई गवळी उद्यानासमोर राजन यांचे अॅटीट्युड मेन्स नावाचे कपड्याचे दुकान आहे. आज (मंगळवार) पहाटे चारच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करुन दुकानातील ९६ हजार १२० रुपये किमतीचे नवीन जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट आणि अन्य कपडे चोरून नेले. भोसरी पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.