अजंता सहकारी बँकेच्या महाव्यवस्थापकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

46

औरंगाबाद, दि. १२ (पीसीबी) – अजंता सहकारी बँकेच्या उस्माणपूरा शाखाचे महाव्यवस्थापक धर्मेंद्र दिगंबर पुराणिक (वय ४५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (गुरुवार) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अजंता सहकारी बँकेच्या उस्माणपूरा शाखेचे महाव्यवस्थापक धर्मेंद्र पुराणिक यांनी समर्थनगर येथील प्लॉट, ६५, अर्चना अपर्टमेंट मोनालिश ब्युटी पार्लरजवळ येथील त्यांच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान धर्मेद्र पुराणिक यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. घटनास्थळी पोलिस पोहोचले आहेत.