अचानक छातीत दुखू लागल्याने छगन भुजबळ रूग्णालयात दाखल  

198

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अचानक छातीत दुखू लागल्याने मुंबईतील जसलोक रूग्णालयात आज (सोमवार) दाखल करण्यात आले आहे. न्यायालयात जात असताना त्यांची प्रकृती अचानक अस्वस्थ झाली.

आज भुजबळ न्यायालयात हजर होण्यासाठी जात होते. मात्र, त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टर मेहता यांच्या निरीक्षणाखाली उपचार करण्यात येत आहे. भुजबळ यांना श्वास घ्यायलाही त्रास होत आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये लगेच सुधारणा न झाल्यास त्यांना लीलावती रूग्णालयात हलवण्यात येऊ शकते, असे सांगितले जात आहे.