अखेर १९ दिवसांनी हार्दिक पटेल यांनी घेतले उपोषण मागे

70

अहमदाबाद, दि. १२ (पीसीबी) – पाटीदार आरक्षण आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी या मागणीसाठी गेल्या १९ दिवसांपासून उपोषणाला बसलेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी अखेर आज (बुधवार) उपोषण मागे घेतले आहे. उपोषणादरम्यान पटेल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल केले होते.