अखेर भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांचा राजीनामा

74

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – उत्‍तर मुंबईचे खासदार आणि भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्‍चन धर्मीयांविषयी केलेल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याबद्दल अखेर आज (शुक्रवारी) राजीनामा दिला आहे.

ख्रिश्चन धर्मीयांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर भाजप श्रेष्ठींनी खासदार गोपाळ शेट्टी यांची चांगलीच कानउघडणी केली. त्यानंतर गोपाळ शेट्टी खासदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात होते.

मला कोणत्याही पदापेक्षा वाणी स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य महत्त्वाचे आणि प्रिय आहे. पक्षाने सांगण्याअगोदर मी आज स्वत:च राजीनाम्याचा निर्णय घेणार असल्याचे गोपाळ शेट्टी यांनी  म्हटले होते. वाणी स्वातंत्र्यांवर गदा आणणारे पद मला नको. त्यामुळे मी आज राजीमाना देणार आहे, असे शेट्टी यांनी म्हटले होते.

दरम्यान, मुंबईतील मालवणीत शिया कब्रस्तान कमिटीच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शेट्टी बोलताना म्हणाले की, भारतातील ख्रिश्चन हे मूळ ब्रिटीश होते. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नव्हता. शेट्टी यांच्या विधानांचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.