अखेर भाजप खासदार कीर्ती आझादांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

64

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – भाजपमधून निलंबित केलेले खासदार कीर्ती आझाद यांनी आज (सोमवार) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आझाद यांचे स्वागत करून त्यांना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व दिले.

दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात आझाद यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.  पक्षविरोधी वक्तव्यांमुळे भाजपने त्यांची २०१५ मध्ये भाजपमधून हकालपट्टी केली होती.

आझाद हे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. काँग्रेस प्रवेशानंतर त्यांना बिहारच्या दरभंगा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात त्यांची लढत भाजप आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या उमेदवाराशी होईल.