अखेर द्रमुकमधील नेतृत्वाचा वाद शमला; एम.के.स्टॅलिन पक्षाचे नवे अध्यक्ष

75

चेन्नई, दि. २८ (पीसीबी) – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्याचा राजकीय वारसा कोण सांभाळणार यावरून द्रमुकमध्ये (द्रविड मुनेत्र कळघम) उफाळलेला वाद अखेर शमला आहे. चेन्नईमध्ये आज (मंगळवार) झालेल्या पक्षाच्या महापरिषदेत द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांची पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.