अखेर ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’, होर्डिंगचे रहस्य उलगडले

0
4198

पुणे, दि. ३ (पीसीबी) – मुंबई-पुण्यात झळकलेल्या  ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ या होर्डिंगबाबत अनेकांचे कुतूहल वाढले होते. मात्र, अखेर या होर्डिंगचे रहस्य समोर आले आहे. ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’, हे होर्डिंग एका नाटकाच्या प्रमोशनसाठी लावण्यात आले आहे. तसेच विशेष म्हणजे या होर्डिंगचा संबंध अभिनेत्री प्रिया बापटच्या ‘गुड न्यूज’शी आहे.

प्रिया बापट नाट्यरसिकांसाठी “दादा, एक गुड न्यूज आहे” हे नाटक घेऊन येत आहे. या नाटकाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. या नाटकात  अभिनेता उमेश कामत आणि हृता दुर्गुळे ही जोडी भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

उमेश या नाटकामध्ये एक साधं नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर विशेष प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका  साकारत आहे. तर हृता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी अशी बहीण दाखवली आहे. ऋताचे हे रंगभूमीवरील पहिलेच व्यासायिक नाटक आहे.