“….अखेर त्या महिलेवर झाला गुन्हा दाखल”

62

चाकण, दि. 19 (पीसीबी) : विक्रीसाठी गांजा बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिच्याकडून 488 ग्रॅम वजनाचा 12 हजारांचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 18) सायंकाळी खेड तालुक्यातील बिरदवडी येथे केली.

पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 35 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरदवडी येथे एका महिलेकडे गांजा असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेकडून 488 ग्रॅम वजनाचा 12 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. महिलेने हा गांजा विक्री कारण्यासाठी जवळ बाळगला होता. चाकण पोलीस तपास करीत आहेत

WhatsAppShare