अखेर एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचा काडीमोड

40

हैदराबाद, दि. १० (पीसीबी) – महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खासदार इम्तियाज जलील यांनी घेतलेली भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका  आहे, असे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आज (मंगळवार) येथे स्पष्ट केले आहे. तसेच  वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात युती होणार नाही, असेही ओवेसी यांनी हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितले.  

असदुद्दीन ओवेसी एमआयएम आणि वंचितच्या युतीबाबत भाष्य करत नाहीत, तोपर्यंत आमची युती कायम असल्याचे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. मात्र आता ओवेसी यांनीच पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याने वंचित आणि एमआयएम विधानसभा निवडणूक वेगवेगळे लढणार  असल्याचे निश्चित झाले आहे.

विधानसभेसाठी जागावाटपाचा तिढा न सुटल्याने एमआयएमने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे,  असे  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी  म्हटले होते.   महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी केवळ ८ जागा एमआयएमसाठी सोडण्यास वंचित आघाडीने तयारी दर्शवली होती, ती आम्हाला मान्य नव्हती’, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले होते.