अखिलेश हे समाजवादी पक्षाचे नव्हे, तर नमाजवादी पक्षाचे अध्यक्ष – अमरसिंह

160

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निवडणूक जिंकल्यानंतर विष्णू मंदिर उभारण्याची घोषणा केली आहे. यावर राज्यसभेचे सदस्य अमरसिंह यांनी निशाणा साधला आहे. अखिलेश हे समाजवादी पक्षाचे नव्हे, तर नमाजवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत, अशी टीका अमरसिंह यांनी  केली आहे.

अखिलेश यादव तुम्हाला विष्णू मंदिर बांधण्याचा अधिकार आहे काय ? असा सवाल करत तुम्ही समाजवादी पार्टीचे नव्हे तर नमाजवादी पार्टीचे अध्यक्ष आहात, अशी टीका अमरसिंह यांनी केली आहे. तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी उभे केलेले राजकीय पुत्र आझम खान यांनी माझ्यासारख्यांना कापून टाकण्याची आणि माझ्या तरुण मुलीवर अॅसिड फेकण्याची भाषा केली आहे.

तुमच्या कुटुंबातही मुली आहेत. अन्य कुटुंबातून आलेल्या सुनाही आहेत. यादव यांच्या घराण्यातील कौटुंबिक वाद सोडविल्यानंतरही माझ्या कठीण प्रसंगी अखिलेश आणि मुलायमसिंग यांच्या संपूर्ण परिवाराने साथ दिली नाही, अशी खंतही अमरसिंग यांनी व्यक्त केली.  मी मुस्लिमांचा सन्मान करतो,  मात्र आझम खान यांच्यासारख्यांचा नाही, असेही ते म्हणाले.