अखिलेशच्या नेतृत्वाखाली भाजपा विरोधात लढणार….

68

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – उत्तर प्रदेशात होणा-या विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं दिसतंय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू असून विधानसभेच्या निवडणूकीत कोण बाजी मारेल याकडे देशाचे लक्ष लागले आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार असं जाहीर केल्यापासून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सध्या भाजप सत्तेत आहे, परंतु त्यांच्या राष्ट्रासाठीच्या कल्पना चांगल्या नाहीत. त्यामुळे भाजप एक वेगळा विचार जनतेमध्ये रूजवत असून तो देशाच्या हिताचा नाही अशा पध्दतीची टीका शरद पवारांनी भाजपवरती केली आहे.

 

भाजपच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष सोडल्याने त्यावर शरद पवारांनी टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा खेळ संपला असून आता शेवटच्या जोड्या घेऊन भाजप निवडणूक लढवत आहे. जेव्हापासून भाजपचे कार्यकर्त्ये इतर पक्षात प्रवेश करीत आहेत म्हणजे हा एक बदल आहे. हे फक्त युपी पुरतं मर्यादीत नसून अनेक राज्यांमध्ये सुध्दा अशीचं परिस्थिती आहे. तसेच सत्तेत असलेला भाजप कधी सामान्य माणसांचा विचार करतो की नाही अशी मला सुध्दा शंका असल्याचे शरद पवारांनी सांगितले.

अखिलेश नेतृत्वात असं असेल नियोजन
राष्ट्रवादी काँग्रेसचं वरीष्ठ नेतृत्व नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखिलेशच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशात निवडणुक लढवणार असल्यााची घोषणा केली आहे. त्याचबरोबर युपीमध्ये प्रत्येक दिवशी अनेक भाजपचे कार्यकर्त्ये इतर पक्षात प्रवेश करीत असल्याचे सुध्दा त्यांनी आवर्जुन सांगितले. यावरून असं लक्षात येतंय की, योगी सरकार किती अहंकारी होती. मलिक यांनी एका विशेष वर्गाचा अन्याय केल्याचं सुध्दा म्हणटलं आहे. भाजपचा पराभव निश्चित असल्याने कार्यकर्त्यांची इतर पक्षाला पसंती असल्याचे सुध्दा मलिक यांनी स्पष्ट केले.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि अखिलेश यांच्यात उमेदवारी सीट निश्चित करण्यावरून बोलणी सुरू आहे. एक सीट फायनल झाली असून इतर सीटची बोलणी सुरू आहे. आम्ही खरंतर भाजपला हरवण्यासाठी अखिलेशला मदत करत असल्याचे नवाब मलिक यांनी जाहीर केले. युपीमध्ये शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून त्यांनी बिगर भाजप पक्ष्यांना मदत करण्याचं ठरवलं आहे. तसेच शिवसेना जर निवडणुक एकटी लढत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. परंतु आम्ही अखिलेशच्या नेतृत्वात निवडणूक लढतोय असं नवाब मलिक यांनी जाहीर केलं.