अंधेरी स्थानकात रेल्वे रुळावर पादचारी पूल कोसळला; ७ जण जखमी

32

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरीत स्थानकात रेल्वे रुळावर पादचारी पूल आज (मंगळवार) सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. पुलाच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल व पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेची वांद्रे ते गोरेगाव दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे.

प्लॅटफॉर्म क्रमांक ७ व ८ वर या पुलाचा भाग कोसळला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुलाचा बराचसा भाग रेल्वे रुळांवर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ओव्हरहेड वायर तुटल्याने यात अधिक भर पडली. अंधेरी ते बोरिवलीपर्यंत लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या होत्या. सध्या वांद्रे ते चर्चगेट आणि गोरेगाव ते विरार वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या अपघातात प्लॅटफॉर्मचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.