अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक

335

लंडन, दि. १९ (पीसीबी) –  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणांनी लंडनमध्ये ही कारवाई केली आहे.

पाकिस्तानी नागरिक असलेला जबीर मोती हा ‘डी-कंपनी’च्या तिजोरीचा सर्वेसर्वा आहे. दाऊदचे आर्थिक व्यवहार जबीर मोती पाहतो. शिवाय, युरोप, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियातही दाऊदचे काम जबीरच पाहतो. जबीर मोती ब्रिटनमध्ये राहत होता. दाऊदची पत्नी महजबीन, मुलगी महरीन आणि जावाई जुनैद (माजी पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियाँदादचा मुलगा) यांच्यातील आर्थिक व्यवहारांच्या चौकशीनंतर हिल्टन हॉटेलमधून जबीर मोतीला ताब्यात घेण्यात आले.