अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी अमेरिका करणार भारताची मदत

151

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी अमेरिका आता भारताची मदत करणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेत दाऊद इब्राहिमला अटक करण्यासाठी अमेरिकेने मदत करण्याचे कबूल केले आहे. त्यासाठी सर्च ऑपरेशन राबविण्यास अमेरिकेने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता, भारत आणि अमेरिका एकत्र येऊन दाऊदच्या मागावर असणार आहेत.

दाऊद हा भारतासाठी मोस्ट वाँटेड असून मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा तो म्होरक्या आहेत. त्यामुळेच २००३ मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने दाऊदवर २५ लाख डॉलर्सचे बक्षीसही लावले आहे. भारताने केलेल्या प्रयत्नांमुळेच युएई आणि ब्रिटनमधील त्याच्या संपत्तीवर टाच आणण्यास मदत झाली आहे. मात्र, आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी अमेरिका भारताची मदत करणार असल्याने लवकरच दाऊद भारतीय तपास यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.