अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला खंडणीप्रकरणी ७ वर्षांची शिक्षा

63

दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला दिल्लीतील सत्र न्यायालयाने खंडणीप्रकरणी ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २००२ मध्ये दक्षिण दिल्लीत ग्रेटर कैलाश भागात राहणारे व्यावसायिक अशोक गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी देत जीवाच्या रक्षणासाठी ५ कोटी रुपयांची मागणी केली होती. याच खटल्याचा निकाल आज आला असून त्यानुसार सालेमला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कोर्टात फिर्यादीच्या आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने सालेमला शिक्षा सुनावली. तत्पूर्वी २६ मे रोजीच सालेमला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणी दिल्लीत अबू सालेमविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.