Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

कडाक्याच्या थंडीत भटक्या कुत्र्यांसाठी स्थानिकांनी देउ केली मायेची ऊब


Main News

इस्तानबुल, दि.१२ (पीसीबी) – एकीकडे भटक्या कुत्र्यांचा संघर्ष केरऴात पेटून उठला आहे. भटक्या कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे त्रस्त झालेल्या येथल्या काही लोकांनी भटक्या कुत्र्यांना मारुन टाकण्याचा सपाटा लावला आहे. तर अलीकडेच भटक्या कुत्र्यांना खाद्य दिले म्हणून पुण्यातील महिला आणि तीच्या आईला शेजाऱ्यांकडून मारहान करण्यात आली होती. तर गेल्याच महीन्यात वसईमधल्या एका तरुणाच्या गाडीवर कुत्र्याने लधूशंका केली म्हणून त्या कुत्र्याला आपल्या गाडीखाली चिरडले होते, असे कितीतरी अमानुष ‌प्रकार आपल्याकडे रोजच पहावयास मिळतात.

पण भूतदया काय असते हे खरेच इस्तानबुलच्या नागरिकांकडून शिकण्यासारखे आहे. सध्या थंडीचे दिवस आहे. ठिकठिकाणी पारा खाली उतरला आहे. कडाक्याच्या थंडीत कितीतरी उबदार वस्त्रे घालूनही थंडीपासून बचाव होत नाही तर तिथे भटक्या कुत्र्यांची काय गत. म्हणूनच या भटक्या कुत्र्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी येथल्या काही नागरिकांनी कुत्र्यांना उबदार चादर तसेच त्यांच्या राहण्याची सोयही केली आहे.


इस्तानबुलमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. येथील भटक्या कुत्र्यांना थंडीत तग धरुन राहणे कठीण होत चालले आहे. अशा वेळी येथील नागरिकांनी रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना ऊब मिऴावी यासाठी चादरी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याचप्रमाणे कार्डबोर्ड किंवा उबदार बॉक्सची सोयही केली आहे. काहींनी या कुत्र्यांना खाणेही देऊ केले आहे. तर उदार दुकानदारांनी देखील आपल्या दुकानाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले केले आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin