Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

पाकची भारताविरुद्ध संयुक्त राष्ट्रांत तक्रार


Main News

संयुक्त राष्ट्रे, दि. ८ (पीसीबी) - पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांमध्ये भारताच्या कथित सहभागाचे पुरावे असलेली कागदपत्रे पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांचे नवीन सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्याकडे सादर केली आहेत. भारताविरोधात या आंतरराष्ट्रीय यंत्रणेकडे कागाळ्या करतानाच, अशा कारवायांना आळा घालण्याची मागणीही पाकने केली आहे. पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी ही कागदपत्रे सरचिटणीसांकडे सोपवली.

पाकिस्तानात भारताच्या आणि ‘रॉ या गुप्तचर संस्थेच्या हस्तक्षेपाचे तसेच बलुचिस्तान, फाटा, कराची येथील दहशतवादी कारवायांमध्ये भारताचा सहभाग असल्याचे पुरावे संयुक्त राष्ट्रांना देण्यात आले आहेत. ऑक्टोबर २०१५ मध्येही असे पुरावे देण्यात आले होते, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने इस्लामाबादमधून जारी केलेल्या निवेदनात म्हटले.

या कागदपत्रांसोबत पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझीझ यांचे पत्रही लोधी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांकडे सोपवले. ‘भारतीय गुप्तचर यंत्रणांचे एजंट कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तानमधून अटक झाली असून त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबामुळे भारताचा पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे,’ अशी मल्लिनाथी अझीझ यांनी या पत्रात केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या दहशतवादविरोधी कराराचा भंग करून भारत या कारवाया करत असल्याच्या कागाळ्याही पाकिस्तानने केल्या आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin