Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

फ्लोरिडा विमानतळावर अंदाधुंद गोळीबार; ५ जण ठार


Main News

फ्लोरिडा, दि. ७ (पीसीबी) - फोर्ट लॉडर्डेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५ जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. विमानतळावरील टर्मिनल २ वर ही घटना घडली. ब्रोवर्ड काउंटी शेरीफच्या कार्यालयाने ही टि्वटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.

विमानतळावरचे सर्व व्यवहार या प्रकारानंतर तत्काळ थांबवण्यात आले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. विमानतळावर आणि परिसरात घबराट पसरली आहे. ब्रोवर्ड काउंटीच्या मेयर बार्बारा शरीफ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, एकच व्यक्ती गोळीबार करत होती. 

विमानतळावर लॉस एंजेलिसकरता उड्डाणासाठी तयार असणाऱ्या एका विमानाच्या खिडकीतून ही संपूर्ण घटना पाहणाऱ्या जिल्लीअन साउंडर्स या महिलेने असोसिएट प्रेस वृत्तसंस्थेला ही घटना सांगितली. 'आम्ही सध्या सुदैवाने सर्वात सुरक्षित ठिकाणी आहोत,' असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण या घटनेवर आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले आहे. या गोळीबारापूर्वी पहाटेपासून या विमानतळावरील उड्डाणांचे वेळापत्रक धुक्यामुळे कोलमडलेले होते. काही विमानांचे उड्डाण रद्दही करण्यात आली होती.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin