Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

फ्लोरिडा विमानतळावर माथेफिरूचा गोळीबार; पाच जण ठार


Main News

फ्लोरिडा, दि. ७ (पीसीबी) – अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील फोर्ट लॉडर्डेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका माथेफिरू व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात पाचजण ठार झाले असून तब्बल आठजण जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आंतरराष्ट्रीय वेळेनुसार शुक्रवारी (दि. ६) रात्री साडेअकरा वाजता घडली. टर्मिनल-२ च्या बॅगेज क्लेम एरियामध्ये ही घटना घडली असून, या घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने विमानतळ सील केले. 

या गोळीबारावेळी सर्व प्रवाशी टरमॅकमध्ये एकत्रित झाले होते. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्रवाशांना सुखरुप स्थळी हलवण्यात आले. अमेरिकेत गेल्या काही वर्षांमध्ये दहशतवादी हल्ला किंवा अन्य कारणांमुळे गर्दीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, आजच्या गोळीबारानंतर विमानतळावरील सर्व व्यवहार तात्काळ थांबविण्यात आले आहेत.

दरम्यान, पोलिसांना हल्लेखोराची ओळख पटली असून तो अमेरिकन सैनिक आहे. या व्यक्तीचे नाव इस्टर्बन सँटिआगो असल्याची माहिती सिनेटर बिल नेल्सन यांनी दिली. इस्टर्बन याने नोव्हेंबर महिन्यात त्याच्या मनाला नियंत्रित केले जात असल्याची माहिती एफबीआयला दिली होती. त्यानंतर इस्टर्बनला काही काळासाठी मनोरूग्णालयात पाठविण्यात आले होते. २००७ ते २०१६ या काळात सँटिआगो प्युअर्टो रिको नॅशनल गार्ड आणि अलास्का नॅशनल गार्ड या दलांमध्ये कार्यरत होता. याशिवाय, २०१० ते २०११ या काळात त्याने इराकमधील युद्धातही सहभाग घेतला होता. युद्धातील कामगिरीबाबत अनेक पदके देऊन त्याचा गौरवही करण्यात आल्याची माहिती पेंटॉगॉनतर्फे देण्यात दिली.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin