Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

भारताने अण्वस्त्रांची यशस्वीरित्या चाचणी केल्यामुळे चीनची आगपाखड


Main News

बिजिंग, दि. ५ (पीसीबी) - भारताने अग्नी ५ आणि अग्नी ४ या अण्वस्त्रांची यशस्वीरित्या चाचणी केल्यामुळे चीनने भारताविरुद्ध आगपाखड केली आहे. भारताला अण्वस्त्रांचा ज्वर चढला असून तो भारतानेच कमी करुन घेणे अत्यावश्यक असल्याचे चीनच्या ग्लोबल टाइम्सने या साम्यवादी पक्षाच्या मुखपत्राने म्हटले आहे.

आपल्या अग्रलेखात चीनने भारताच्या आण्विक धोरणावर टीका केली आहे. भारत जरी अणुशक्तीच्या बाबतीत सक्षम झाला असेल तरी भारताचे सामर्थ्य जागतिक पातळीवर दिसण्यासाठी अवकाश असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. भारताच्या अग्नी ४ ची क्षमता ही ४,००० किमीपर्यंतचा पल्ला गाठण्याची आहे आणि अग्नी ५ ची क्षमता ही ५,००० किमीपर्यंतचा पल्ला गाठण्याची आहे. यावरुन भारताची आक्रमकता दिसून येत असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

 जेव्हा भारताने अग्नी ५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली तेव्हा चीनने १८ वर्षे जुन्या कराराचा संदर्भ घेऊन म्हटले, की भारताने संयुक्त राष्ट्राच्या कराराचे उल्लंघन केले आहे. भारत आणि पाकिस्तानने आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी करू नये याबाबत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनी मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्या तत्वांची भारताने पायमल्ली केल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ च्युनयिंग यांनी म्हटले होते.

भारताचे सामरिक सामर्थ्य हे कोणत्याही एका देशाला लक्ष्य करण्यासाठी वाढवण्यात आलेले नाही. भारताने सर्व आंतरराष्ट्रीय नियमांच्या अधीन राहून अग्नी-५ ची चाचणी केली. इतर देशांनीदेखील नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा आहे. भारताचे वाढते सामर्थ्य सामरिक स्थैर्यासाठी आवश्यक आहे,’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी म्हटले होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin