Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

मानवी शरीरात नवीन अवयवाचा शोध


Main News

लंडन, दि. ५ (पीसीबी) -  आयर्लंडच्या वैज्ञानिकांनी मानवी शरीरात एका नवीन अवयवाचा शोध लावला असून जो आतापर्यंत कुणाच्या निदर्शनास आला नव्हता. त्यामुळे गेली शंभर वर्षे शिकवले गेलेले शरीरशास्त्र अचूक नव्हते हे स्पष्ट झाले आहे.

या नव्या संशोधनामुळे पोट व पचनसंस्थेच्या विकारांवर उपचार करणे सोपे होणार आहे. आतडे व पोट यांना जोडणारी जी आंत्रपेशी असते, ती वेगवेगळ्या भागांची बनलेली असते असे आतापर्यंत मानले जात होते, पण आयर्लंडच्या लिमरिक विद्यापीठाचे शल्यशास्त्र प्राध्यापक जे. काविन कॉफी यांनी हा एकच अखंड अवयव असल्याचे सांगितले. द लँसेट गॅस्ट्रोइन्ट्रोलॉजी अँड हेपॅटॉलॉजी  या नियतकालिकात याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला असून त्यात आंत्रपेशी हा संपूर्ण अवयव असल्याचे म्हटले आहे. या शोधनिबंधाचे कठोर परीक्षण करण्यात आले असून त्यात तो एकच अवयव असल्याचे मान्य करण्यात आले.

आतापर्यंत तो एकच अवयव असल्याचे समजले नव्हते. यामुळे आता फारसे छेद न देता शस्त्रक्रिया करता येतील व त्यात गुंतागुंत कमी होईल, खर्चही कमी होईल. जर आपण एक पूर्ण अवयव म्हणून आंत्रपेशीचा विचार केला तर पोटाच्या रोगांचे वेगळे वर्गीकरण शक्य आहे. कॉफी यांच्या मते मेसेंट्रिक सायन्स म्हणजे आंत्रपेशी विज्ञान हे गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, न्यूरॉलॉजी व कोलोप्रॉक्टोलॉजी यासारखेच एक वेगळे विज्ञान किंवा वेगळी वैद्यक शाखा आहे. आतडे शरीराशी जोडण्याचे काम मेसेंटरी म्हणजे आंत्रपेशी करीत असते. त्या संदर्भात तो विभाजित अवयव मानला जात होता, त्याची रचना गुंतागुंतीची असून तो एकच अवयव आहे. गेली शंभर वर्षे तो तसा मानला जात नव्हता.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin