Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

जगप्रसिद्ध नेपच्युनचा पुतळा फेसबुकच्या दृष्टीने अश्लिल


Main News

इटली, दि. (पीसीबी) – इटली येथील बोलोग्ना शहरात असलेला नेपच्युनचा पुतळा फेसबुकने ब्लॉक केला आहे. फेसबुकच्या नियमावलीत अश्लील किंवा नग्न फोटो ब्लॉक केले जात असतात. हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर चर्चिले गेल्यानंतर फेसबुकने हा फोटो अनब्लॉक केला आहे.

इटलीतील लेखिका इलिसा बारबरीने यांनी फेसबुक पेज तयार केला होता. यावर तिने या नेपच्युनच्या पुतळ्याचा फोटो ठेवला होता. पण यावर फेसबुकने यावर आक्षेप घेतला आहे. इटलीची शान असलेल्या या जगप्रसिद्ध पुतळ्यावर अश्लिल असल्याचा शेरा फेसबुकने कसा मारला असा सवाल या लेखिकने केला आहे.

 सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर फेसबुकने यावर आपले स्पष्टीकरण दिले. १५ व्या शतकात बोलोग्ना शहरातील या चौकात हा कारंजा बांधण्यात आला आहे. नेपच्युन ही प्राचीन रोममध्ये जलदेवता होती. त्यामुळे येथल्या कारंज्यावर वरच्या भागात हातात त्रिशूल असलेला नेपच्युनचा पुतळा आहे.

हा कारंजा जुना आहे. याचा फोटो लेखिकेने फेसबुकवर टाकला असता त्यावर फेसबुकने आक्षेप घेतला. फेसबुकच्या नियमावलीत हा फोटो बसत नाही, त्यामुळे फेसबुकने तो फोटो ब्लॉक केला होता.

 

 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin