Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

इराकमध्ये आत्मघाती कारबॉम्ब हल्ल्यात ३२ जण ठार


Main News

बगदाद, दि. ३ (पीसीबी) - इराकची राजधानी बगदाद येथे घडवून आणलेल्या आत्मघाती कारबॉम्ब हल्ल्यात ३२ जण ठार, तर अनेक जण जखमी झाले. मृतांत बहुतांश रोजंदारी मजुरांचा समावेश आहे. हे लोक सद्र शहराच्या चौकात कामाच्या प्रतीक्षेत उभे असताना त्यांना लक्ष्य करण्यात आले. स्फोटानंतरची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकण्यात आली आहेत. त्यात घटनास्थळावरून काळ्या धुराचे लोट उठत असल्याचे दिसत आहे.

या स्फोटात ३२ ठार, तर ६१ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. तथापि, यामागे इस्लामिक स्टेटचा हात असण्याची दाट शक्यता आहे. कारण, इस्लामिक स्टेटने यापूर्वी बगदादमध्ये असे अनेक हल्ले घडवून आणले आहेत. गेल्या तीन दिवसांत बगदाद शहरात झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. शनिवारी मध्य बगदादमधील एका गजबजलेल्या बाजाराला लक्ष्य करून दुहेरी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. यात २७ लोक ठार झाले होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin