Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

जुन्या आयफोन व अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअॅप बंद


Main News

न्यूयॉर्क, दि. ३ (पीसीबी) - सोशल मीडियामध्ये दबदबा असलेल्या व्हॉट्सअॅपने जुने आयफोन आणि अँड्रॉइड हँडसेटवर सेवा देणे बंद केले आहे. नवीन फिचर्स देतानाच सुरक्षा देखील जपली जावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे वृत्त अमेरिकेतील एका दैनिकाने दिले आहे.

अँडॉइड २.१ ‌किंवा २.२, आयफोन ३ जीएस किंवा आयओएस ६ तसेच विंडोज ७ वापरणा‍ऱ्यांना व्हॉट्सअॅप हे अॅप बंद झाल्याचे लक्षात आले असेल. हे जुने हँडसेट वापरणा‍ऱ्यांना व्हॉट्सअॅप वापरायचे असेल तर त्यांनी नवीन हँडसेट खरेदी करावेत, असा सल्ला कंपनीने दिला असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

इन्क्रिप्शन आणि अन्य गोपनीयता सेवा अधिक प्रभावीपणे पुरविण्याचा एक मोठा भाग म्हणून हे बदल केले जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे व्हॉट‍्सअॅप मेसेज आणि चॅट त्रयस्थाला वाचता येणार नाहीत. त्यामुळे व्हॉट्सअॅप मेसेज आणि चॅट सार्वजनिक करण्याची मागणी करणा‍ऱ्या सरकारांच्या रोषाला कंपनीला सामोरे जावे लागेल, असे वृत्तात म्हटले आहे. भविष्यात व्हॉट्सअॅप नवनवीन फिचर्स लागोपाठ सादर करणार आहे. त्यामध्ये एखाद्याला चुकून सेंड केलेला मेसेज पूर्णपणे ‌डीलीट करण्याची सोय व्हॉट्सअॅप वापरणा‍ऱ्यांना यंदाच उपलब्ध होणार आहे.

ब्लॅकबेरी, नोकियावर लवकरच सेवा

ब्लॅकबेरी आणि नोकियाच्या काही हँडसेटवर हे अॅप चालणार नसल्याचे व्हॉट्सअॅपने सुरुवातीलाच जाहीर केले होते. मात्र तक्रारींचे प्रमाण वाढल्यानंतर व्हॉट्सअॅपने माघार घेतली आहे. ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी १०, नोकिया एस४० आणि नोकिया सिंबियान एस६० या हँडसेटवर ३० जून २०१७पर्यंत आम्ही ही सेवा सुरू करू, असे व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉगवर जाहीर केले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin