Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

बाजारात सोबत नवरा नाही म्हणून महिलेचा केला शिरच्छेद


Main News

काबूल, दि. २ (पीसीबी) – अफगाणिस्तानचा काही भागात अजूनही महिलांवर कठोर निर्बंध आहेत या निर्बंधाचे उल्ल्घंन झाल्यास महिलांच्या बाबतीत क्रौर्याची परिसीमा गाठली जाते. अफगाणिस्तानातील दुर्गम गावातील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आली आहे. या गावातील महिला एकटी बाजारात आली म्हणून सशस्त्र हल्लेखोरांनी महिलेचा शिरच्छेद केला.

सर-इ-पूल प्रांतातील लात्ती गावात ही घटना घडली. या गावात तालिबानची राजवट आहे. हि महिला नवऱ्याला सोबत न घेता एकटी खरेदीसाठी बाहेर गेली म्हणून तिची हत्या करण्यात आली असे सर-इ-पूल प्रांताचे राज्यपाल झबीउल्लाह अमानी यांनी सांगीतले. या महिलेचा नवरा ईरानमध्ये नोकरी करतो.

तालिबानच्या राजवटीत  महिलांना जवऴचा पुरुष नातेवाईक सोबत नसेल तर घराबाहेर पडण्यावर बंदी आहे. शिकण्यावर, नोकरी करण्यावर बंदी असून त्यांना जबरदरस्तीने बुरखा घालावा लागतो. या घटनेशी आपला काही संबध नसल्याचे तालीबानने म्हटले आहे. या महीन्याच्या सुरुवातीला अफगाण विमानतळावर सुरक्षा रक्षकांची नोकरी करणाऱ्या पाच महिलांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin