Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

‘टायटॅनिक’ हिमनगावर आदऴून बुडाले नव्हते


Main News

ब्रिटन, दि.२ (पीसीबी) – कधीही न बुडणारे जहाज अशी ज्या जहाजाची ख्याती होती. त्या टायटॅनिक जहाजाला आपल्या पहिल्याच प्रवासात जलसमाधी मिळाली. १५ एप्रिल १९१२ रोजी हे महाकाय जहाज हिमनगावर आदळून उत्तर अंटलांटिका महासागरात बुडाले होते. २०१२ मध्ये या घटनेला १०० वर्ष पूर्ण झाली. पण ते जहाज हिमनगावर आदळून बुडाले नसल्याचा दावा आररिश पत्रकार सेनेन मोलॉनी यांनी केला आहे. 

या पत्रकाराने केलेल्या संशोधनानुसार टायटॅनिक हे आगीमुळे बुडाले. बॉयलरच्या भागात आग लागली होती. यामुळे जहाज कमकुवत  झाले होते. या भागाकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यातून कमकुवत झालेला भागच हिमनगाला आदळल्यामुळे जहाज बुडाले, असा दावा त्यांनी केला आहे.

ब्रिटनच्या साऊथ हॅप्टन येथून न्यूयार्कला जाण्यासाठी टायटॅनिक जहाज निघाले होते. पण ते कधी न्यूयॉर्कला पोहचलेच नाही. १४ एप्रिला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी उत्तर अटलांटिक महासागराच्या विशाल हिमनगावर  जहाज आदळले. १५ एप्रिलला अवघ्या दोन तास ४० मिनिटांत हजारो प्रवाशांना पोटात घेऊन  जहाजाने जलसमाधी घेतली. या घटनेला आता १०५ वर्ष होतील. बॉयलर भागात सतत आग भडकत होती. या आगीमुळे टायटॅनिकचे भाग अत्यंत कमकुवत झाले होते. त्यातून कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी गत झाली. हे जहाज विशाल हिमनगरावर आदळले आणि टायटॅनिक तुटले. पण आगीमुळे ते आधीच कमकुवत झाले होते असा दावा त्यांनी केला आहे. या वर त्यांनी एक माहितीपट बनावला असून तो लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.

मोलानी यांनी यावर तीस वर्ष  संशोधन केले. आगीमुळे जहाजाच्या पट्या खुपच कमकुवत झाल्या होत्या. त्यावेळी जहाजातील बॉयलरचे तापमान १ हजार डिग्रीच्या वर पोहचले होते. त्यामुळे हिमनगावर आदळताच ते तुटले असा निष्कर्ष् त्यांनी काढला. टायटॅनिक बुडण्याचे खरे कारण हे हिमनग नसून मानवी निष्काळजीपणा आणि आग होती, असे समोर आले आहे.      

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin