Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

गोल्फ स्टिक्सपासून तयार केली सायकल


Main News

लंडन, दि. (पीसीबी) - ब्रिटनमधील एका विद्यार्थ्याने गोल्फ खेळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टिक (काठी) पासून  चक् एक सायकल तयार केली. किंगस्टन युनिव्हर्सिटी ऑफ लंडनयेथेग्राफिक डिझाईनचा अभ्यास करत असलेल्या कॅरल रे याने गोल्फ स्टिकपासून सायकल तयार केली आहे.

यासंदर्भात कॅरल याने सांगितले की, अनेक गोल्फ क्लब बंद झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. अशा अनेक गोल्फ क्लब्सना मी भेटी दिल्या. यावेळी तेथील लोकांनी मला क्लबची संख्या बरीच कमी झाल्याचे सांगितले. याचवेळी तेथे मोठ्या संख्येने गोल्फ स्टिक्स पडलेल्या पाहिल्या आणि माझ्या मनात त्यापासून सायकल तयार करण्याचा विचार आला. 

त्यानंतर कॅरलने गोल्फ स्टिक्स खरेदी करण्यास सुरुवात केली. मात्र, सायकल तयार करताना त्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. कारण या स्टिक्स अत्यंत पातळ आणि हलक्या असल्याने त्या वेल्डिंग करून जोडणे अवघड असत. मात्र, त्यांना डबल वेल्डिंग करून जोडणे शक्य असते. यासाठी  वेळही जास्त लागतो. मात्र, महत्प्रयासानंतर कॅरलचे स्वप्न साकार झाले आणि वजनाने हलकी आणि मजबूत सायकल तयार झाली. अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर आकर्षक सायकल तयार झाल्याने समाधान वाटते, असे कॅरलने सांगितले

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin