Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

इंडोनेशियात नौका दुर्घटनेत २३ जणांचा मूत्यू, १७ बेपत्ता


Main News

जकार्ता, दि. (पीसीबी) – जकार्ता येथून५० कि.मी दूर असलेल्या तिडुंग  येथे दोनशे प्रवासी बोटीत घेऊन जात असतांना अचानक बोटीनेे पेट घेतल्याने २३ जणांचा होरपाळून मूत्यू झाल्याची घटना घडली. यात १७ जण बेपत्ता झाले असल्याचे वृत्त आहे.

तिडुंग एक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी प्रवाशांना ही बोट घेवून जात होती. त्यावेळी तिला अचानक आली लागली, असे राष्ट्रीय आपत्ती संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पूवरे नुग्राहो यांनी सांगितले.

सुरूवातीला या दुर्घटनेत दोन जण ठार झाल्याचे सांगण्यात आले होते, तर १७ जण बेपत्ता होते पण नंतर २३ जण मरण पावल्याचे स्पष्ट झाले. बोटीत लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही. अधिकारी अजूनही प्रवाशांचा शोध घेत आहेत असे वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मदत पथक पाठवण्यात आले आहे.

इंडोनेशियात एकूण १७ हजार लहानमोठी बेटे असून ती वाहतुकीसाठी बोटींवर अवलंबून आहेत. यात सुरक्षिततेचा अभाव असून अपघात नित्याचेच झाले आहेत.

गेल्या नोव्हेंबर महिन्यात एक स्पीड बोट उलटून ५४ जण ठार झाले होते, त्या बोटीत एकूण ९८ प्रवासी होते. ते सर्व मलेशियातून बाटमला जाणारे इंडोनेशियाचे स्थलांतरित कर्मचारी होते.

 

 

" >

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin