Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

मसूद अझहरवर बंदी घालण्याची भारताची मागणी तथ्थहीन- पाकिस्तान


Main News

इस्लामाबाद, दि. २ (पीसीबी) - दहशतवादी मसुद अझहरवर बंदी घालण्याच्या भारताच्या मागणीत गांभीर्याचा अभाव असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांकडे दहशतवादी मसुद अझहरवर बंदी घालण्याची मागणी केली होती. भारताने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेसमोर केलेली मागणी राजकीयदृष्टीने प्रेरित असल्याची टिकादेखील पाकिस्तानकडून करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या टिकेच्या दोन दिवस आधी मसूद अझहरवर बंदी आणण्याच्या भारताच्या प्रस्तावात चीनने अडथळा आणला होता. मसूद अझहर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या असून याच दहशतवादी संघटनेने पठाणकोटमधील तळावर हल्ला घडवून आणला होता.
 
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अझहरवर बंदी आणण्याचा प्रस्ताव भारताने सादर केला होता. मात्र चीनने भारताचा हा प्रस्ताव हाणून पाडला. ‘आयसिस/अल कायदा या संघटनांच्या विषयांशी संबंधित समितीने भारताचा प्रस्ताव फेटाळून लावला. भारताकडून दाखल करण्यात आलेला प्रस्ताव राजकीयद्दष्ट्या प्रेरित होता. भारताचा प्रस्ताव निराधार माहितीचा आणि तथ्थहीन आरोपांचा समावेश होता. या प्रस्तावातून भारताचा राष्ट्रीय अजेंडा अतिशय संकूचित असल्याचे दिसून आले,’ अशी टिका पाकिस्तानच्या पररष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झफेरिया यांच्याकडून करण्यात आली आहे.
 
मसूद अझहरवर बंदी आणण्याचा भारताचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. मसूद अझहरच्या माध्यमातून राजकारण करण्यात भारताचा प्रयत्न होता. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीच्या कामाला सुरूंग लावण्यासाठी भारत प्रयत्नशील होता. मात्र भारताचा हा प्रयत्न अपयशी ठरला, असे नफीस झकेरिया यांनी म्हटले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin