Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

कॉम्प्युटर आता सुरक्षित राहिलेला नाही, लोकांनी कुरिअरचा जास्तीत जास्त वापर करावा- डोनाल्ड ट्रम्प


Main News

अमेरिका, दि. (पीसीबी) - ‘कोणताही कॉम्प्युटर सुरक्षित नाही, त्यामुळे लोकांनी कुरिअर सेवेचा वापर करावा,’ असे आवाहन अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘खासगी माहितीच्या सुरक्षेचा विचार लक्षात घेता कोणताही संगणक सुरक्षित नाही. दैनंदिन कामकाजापासून ते अगदी आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत कोणत्याही गोष्टीचे नियोजन करण्यासाठी कॉम्प्युटर सुरक्षित नाही,’ असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प स्वत: -मेल आणि कॉम्प्युटरचा अत्यंत कमी वापर करतात. मात्र डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर नेहमीच सक्रीय असतात. ‘तुम्हाला काही महत्त्वाचा संदेश पाठवायचा असल्यास, तो लिहून कुरिअरने पाठवा. जुन्या पद्धतीचा वापर करा. कारण कोणताही संगणक सुरक्षित नाही,’ असे डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले. ‘कोणी काही म्हटले तरी मला फरक पडत नाही’, असेदेखील ट्रम्प यांनी म्हटले.|

अमेरिकन निवडणूक प्रक्रियेत रशियाने हॅकिंगच्या माध्यमातून हस्तक्षेप केल्याबद्दलच्या कथित प्रकरणावर भाष्य करणे ट्रम्प यांनी वारंवार टाळले आहे. रशियाने अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हॅकिंगच्या माध्यमातून हस्तक्षेप केल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा आरोप आहे. याच आरोपावरुन ओबामा प्रशासनाने अमेरिकेतील रशियाच्या ३५ राजदूतांची हकालपट्टी केली आहे. रशियाचे अमेरिकेतील दूतावास बंद करण्याचा निर्णयदेखील अमेरिकन प्रशासनाने घेतला आहे. मात्र रशियाकडून अमेरिकेच्या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प लवकरच गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलतान

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin