Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

इस्तंबूलमध्ये नववर्षाच्या स्वागत समारंभात गोळीबार; ३९ ठार


Main News

इस्तंबूल, दि.१ (पिसीबी) - तुर्कीमधील इस्तंबूल शहरात एका नाईट क्लबमध्ये नविन वर्षाच्या स्वागत समारंभात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३९ लोक ठार तर, ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये १६ जण विदेशी नागरीक असल्याची माहीती इस्तंबूलचे गव्हर्नर वासीप शाहीन यांनी दिली. इस्तंबूल शहरात नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एका नाईट क्लबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सांताक्लॉजच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी प्रथम एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी पार्टीत सहभागी झालेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात अनेकांचा जागीच मृत्यू झाला. 

कट्टरवाद्यांनी हा हल्ला केल्याचे गव्हर्नर शाहीन यांनी सांगितले. परंतू अद्याप दहशतवाद्यांच्या कोणत्याच गटाने या हल्याची जबाबदारी घेतलेली नाही. अद्याप विस्तृत माहिती समोर आलेली नाही. काही महिन्यांपुर्वी झालेल्या दहशतवादी हल्यामुळे तुर्कीत हायअर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे इस्तंबूल शहरात सुमारे १७ हजार पोलीस अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. 

यापुर्वीचे काही हल्ले हे कट्टरपंथी किंवा इस्लामिक स्टेट, कुर्द बंडखोरांनी केलेले आहेत. पंधरा दिवसांपुर्वी रशियाचे राजदूत अँड्रेड कारलोव्ह यांची तुर्कीच्याच एका पोलीस अधिकाऱ्याने गोळी झाडून हत्या केली होती. गोळीबारानंतर सिरीयामधील अलेप्पो शहरात झालेल्या घटनेत सहभागी असलेल्या रशियाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचे हल्लेखोर ओरडून सांगत होता.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin