Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

साबण, बॉडीवॉशमुळे प्रेमजीवन होतेय नष्ट; शास्त्रज्ञांचा निष्कर्ष


Main News

वॉशिंग्टन, दि. १ (पीसीबी) - जीवाणूविरोधी साबण व बॉडीवॉशमुळे लोकांच्या प्रेमजीवनावर परिणाम होत असल्याचा दावा अमेरिकी शास्त्रज्ञांनी केला आहे. या उत्पादनांतील ट्रायक्लोसन रसायन त्यास कारणीभूत आहे. शरीर जीवाणुमुक्त करण्यात ट्रायक्लोसनचा वापर प्रभावी ठरतो. मात्र, ते माणसाच्या हालचाली, लैंगिक जीवन व हार्मोन्ससाठी नुकसानकारक ठरते. यामुळे मांसपेशी कमकुवत होतात आणि माणसाला थकवा व आळस जाणवू लागतो.

हा निष्कर्ष समोर आल्यानंतर अमेरिकी राज्य मिनेसोटाने १ जानेवारीपासून या रसायनाचा वापर बंद करण्याचा निर्णय झाला. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानेही (एफडीए) सप्टेंबर २०१७ पासून देशात याचा पूर्णपणे वापर रोखण्याचे आदेश बजावले आहेत. ट्रायक्लोसन रसायनाचा उपयोग सर्व प्रकारच्या जीवाणूविरोधी साबण, बॉडीवॉश, डिओडरंट्स, टूथपेस्ट आदींमध्ये होतो. यावर काही दिवसांपूर्वी मिनेसोटामध्ये एक संशोधन झाले. त्यात ट्रायक्लोसन रसायनाचा सर्वाधिक वापर जीवाणूविरोधी साबण आणि बॉडीवॉशमध्ये होत असल्याचे दिसून आले. यामुळे लोकांचे प्रेमजीवन नष्ट होऊ शकते. या शोधानंतर देशात ट्रायक्लोसन रसायनावर बंदी लादण्याची मागणी केली जात होती. 

मिनेसोटाचे वरिष्ठ सिनेटर जॉनी मार्टी यांच्या मते, आम्ही देशाला या रसायनापासून मुक्त करू इच्छित आहोत. त्यामुळेच हे पाऊल उचलले आहे. एफडीएनेही कंपन्यांना म्हटले की, साबण आणि अन्य उत्पादनांमध्ये या रसायनाचा वापर केला जाऊ नये. एफडीएच्या संचालक डॉ. जनेट वुडकुक यांच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांचा जीवाणूविरोधी साबणाच्या वापरापासून बचाव केला पाहिजे. मात्र, त्या बदल्यात अन्य कोणत्या साबणाचा वापर करण्याची शिफारस करणार नाहीत. शास्त्रज्ञांनी आम्हाला दिलेल्या डेटामध्ये जीवाणूविरोधी साबणात वापरले जाणारे घटक आरोग्यासाठी धोकादायक आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin