Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

अमेरिकेत ट्रम्प समर्थकांना हॉटेलमध्ये येण्यावर मज्जाव


Main News

वॉशिंग्टन, दि. ३० (पीसीबी) - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जितके समर्थक आहे तितकेच त्यांचे विरोधकही आहे. ट्रम्प यांचे या महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येणे म्हणजे अनेकांसाठी धक्काच होता. त्यामुळे त्यांच्या विजयानंतर अनेकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. एका हॉटेल मालकाने ट्रम्प यांच्या समर्थकांना आपल्या हॉटेलमध्ये येण्यास बंदी घातली आहे. हॉटेलच्या बाहेर त्यांने तसा फलकच लावला आहे. ट्रम्प समर्थकांना या हॉटेलमध्ये जेवण मिळणार नाही, अशी सूचना त्यांनी खिडकी बाहेर लावली आहे.

 

हवाईमधल्या कॅफे / या हॉटेलने ज्यांनी अमेरिकन निवडणुकांमध्ये ट्रम्प यांना मत दिले आहे त्यांना जेवण देण्याची भूमिका घेतली आहे. सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत या हॉटेल मालकाने सांगितले, नोव्हेंबरपासूनच त्यांनी ही सूचना लावली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मत देऊन त्यांच्या समर्थकांनी अमेरिकेला अधोगतीकडे नेले आहे. त्यामुळे त्यांना कॅफेमध्ये प्रवेश देण्याचे मी ठरवले आहे. पण या हॉटेलमध्ये अनेक ट्रम्प समर्थक येतात असेही त्यांनी सांगितले. काही जण आपण ट्रम्प यांना मत दिले, असे कबुल करतात पण जेवणाची मागणी केली तर आम्ही कोणतेही आढेवेढे घेता त्यांना जेवण देतो, असेही या मालकांनी सांगितले. ट्रम्प यांचा विजय झाला असला तरी अनेक अमेरिकन नागरिक ट्रम्प यांच्या विरोधात आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin