Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

'लास्ट ख्रिसमस' गाणाऱ्या पॉपस्टार जॉर्ज मायकलचे ख्रिसमसलाच निधन


Main News

लंडन दि.३० (पीसीबी)-  ज्यानेलास्ट ख्रिसमस म्हणत अवघ्या पॉप जगतावर अधिराज्य गाजवले, त्या पॉपस्टार जॉर्ज मायकलचे ख्रिसमसच्याच दिवशी निधन झाले. वयाच्या ५३ व्या वर्षी इंग्लंडमधल्या राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला. मायकलच्या अकाली मृत्यूने पॉप जगतात खळबळ उडाली आहे.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा जॉर्ज मायकलच्या निकटवर्तीयांनी केला आहे.

१९६३ साली जन्मलेल्या जॉर्जने ८० च्या दशकामध्ये पॉप विश्वामध्ये वादळ आणले होते. शाळेतील मित्रांसह जॉर्जने व्हाम नावाचा म्युझिक बॅण्ड सुरु केला. ‘केअरलेस व्हिस्परया अल्बमने तेव्हा धुमाकूळ घातला. त्या अल्बमच्या तब्बल ६० लाख प्रती विकल्या गेल्या. जॉर्जच्या सर्व अल्बमच्या मिळून तब्बल १० कोटी प्रती विकल्या गेल्या आहे.

त्यानंतरच्या तीन दशकांमध्ये जॉर्ज मायकलचे गारुड तरुणाईवर कायम राहिले. गुड लुक्स, स्टेज अपियरन्स आणि लेटेस्ट फॅशन ट्रेण्ड्समुळे जॉर्ज कायमच तरुणाच्या गळ्यातील ताईत बनला. ग्रॅमी, बिलबोर्ड, एमटीव्ही अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित जॉर्ज मायकल अनेक कॉन्ट्रॉव्हर्सीजमुळे बदनामही झाला होता. जॉर्जनं आयुष्यातला हाच चढ उतार डिफरंट स्टोरी नावाच्या रुपाने आत्मचरित्रातूनही मांडला. ‘लास्ट ख्रिसमसहे गाणे लिहून आणि गाऊन चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा जॉर्ज ख्रिसमसच्या दिवशीच जाणे हा नियतीचा क्रूर खेळच म्हणावा लागेल

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin