Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

बँकेत जमा झालेले ४ लाख कोटी संशयास्पद


Main News

नवी दिल्ली, दि.३० (पीसीबी) – नोटाबंदीनंतर बँकांमध्ये जमा झालेले ४ लाख कोटी रुपये संशयाच्या घेऱ्यात येण्याची शक्यता आहे. ज्या बँक खात्यांमध्ये अघोषित उत्पन्न जमा करण्यात आले आहे, त्यांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले. तसेच खात्यांमध्ये जमा झालेल्या पैशांचा स्त्रोत जाहीर न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.

नोटाबंदीनंतर अनेकांनी काळ्याचे पांढरे करण्यासाठी बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले. पण या जमा झालेल्या रकमेवर आयकर विभागाचे लक्ष आहे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १७ डिसेंबरपर्यंत १.१४ लाख बँक खात्यांमध्ये ४ लाख कोटी जमा झाले आहेत या रकमेतील मोठा भाग हा अशा  लोकांचा असण्याची शक्यता आहे ज्यांनी काळ्याचे पांढरे केले आहे या साऱ्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आयकर विभागाकडून संबंधित खातेधारकांचे इन्कम टॅक्स रिटर्न मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

नियमानुसार टॅक्स भरणाऱ्यांना स्वत: जवळ मोठ्या प्रमाणात रोकड बाळगता येत नाही. बँकांमध्ये मोठी रक्कम जमा करणाऱ्या पाच हजार जणांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. प्रत्येक आठवड्याला मिळणाऱ्या माहितीनुसार अघोषित उत्पन्न जमा करणाऱ्यावर कारवाई केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगीतले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin