Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

देशप्रेमापोटी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डोने धुडकावली २,०१५ कोटींची ऑफर


Main News

आबूधाबी, दि. ३० (पीसीबी) - क्रीडा क्षेत्रात पैशांसाठी खेळाडू आपला व्यावसायिक संघ सोडून दुसऱ्या संघात सर्सास जात असताना रिअल माद्रिदच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने चीनच्या एका फुटबॉल क्लबकडून मिळालेली ३१५ दशलक्ष डॉलरची (२०१५ कोटी रुपये) ऑफर धुडकावली आहे. जागतिक फुटबॉल विश्वावर दबदबा असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला एका चीनच्या क्लबने ही ऑफर दिली होती. ही केवळ क्लब बदलण्याची रक्कम किंवा ट्रांसफर फी आहे त्या व्यतिरिक्त त्याला वर्षाला १०० दशलक्ष डॉलरही देण्याचा करार होण्याची शक्यता होती. परंतु, रोनाल्डोने या दोन्ही ऑफर धुडकावून लावत आपल्याच संघासाठी म्हणजे रिअल माद्रिदसाठी खेळण्याचा निर्णय घेतला.

 

रोनाल्डोचा एजंट जॉर्ज मेंडेस याने ग्लोब सॉकर अवार्डस् मध्ये ही बाब माध्यमांना सांगितली. रोनाल्डोसाठी पैसा म्हणजे सर्वकाही नाही त्याच्यासाठी रिअल माद्रिद हा क्लब जीव की प्राण आहे, असे मेंडेसने म्हटले. चीनमध्ये गेल्या काही वर्षापासून चायनीज सुपर लीगची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे येथील बाजारपेठ नवी आहे. त्यांना हवे ते खेळाडू हवे ते पैसे मोजून ते विकत घेऊ शकतात परंतु रोनाल्डोला चायनीज सुपर लीगमध्ये आणणे ही गोष्ट अशक्य आहे, असे मेंडेसनी म्हटले.

 

अर्जेंटिनाचा प्रसिद्ध खेळाडू कार्लोस टेव्हेजने नुकताच शंघाई शेन्हुआ या संघासाठी करार केला आहे. चीनच्या संघाने त्याला ९० दशलक्ष डॉलर्स दिले असण्याचे वृत्त आहे. या व्यतिरिक्त ब्राझीलचा खेळाडू ऑस्कर हा देखील शंघाई एसआयपीजीकडून खेळणार आहे. त्याला देखील ६५ दशलक्ष डॉलर्स देण्यात आले असावेत असा अंदाज बांधण्यात येत आहे.

 

हे माझ्या कारकीर्दीतील सर्वात चांगले वर्ष असल्याचे रोनाल्डोने म्हटले. त्याला नुकताच दुबई ग्लोब सॉकर अवार्ड मिळाला. २०१६ या वर्षात रोनाल्डोच्या राष्ट्रीय संघाने युरो कप जिंकला. त्याच्या रिअल माद्रिद या संघाने चॅम्पियन्स लीग तर त्याने बॅलन डी ओर हा पुरस्कारदेखील जिंकला. २०१६ च्या मेपासून रोनाल्डोचे जिंकण्याचे सत्र सुरू झाले होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin