Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

…..आज ‘रेनकोट’चा जनक चार्ल्स मॅकिन्टॉशच्या २५०व्या जयंतीनिमित्त गुगलचे डुडल


Main News

कॅलीफोर्नीया, दि. २९ (पीसीबी) - धो धो कोसळणा-या पावसात भिजण्यापासून आपल्याला वाचवतो तो रेनकोट. तसा आपल्यापैकी अनेकांना तो ओल्डफॅशन वगैरे वाटत असला तरी त्याची सर छत्रीला यायची नाही हेही तितकेच खरे. आज या रोनकोटचा शोध लावणा-या चार्ल्स मॅकिन्टॉशची २५० वी जयंती आहे. त्यामुळे चार्ल्सला गुगलने खास गुगल डुडल बनवून मानवंदना दिली आहे.

 

आज गुगल उघडता पावसात रेनकोट घालून भिजणारा एक व्यक्ती दिसेल. ही तिच व्यक्ती आहे जिने रेनकोटचा शोध लावला. आज चार्ल्स मॅकिन्टॉशची २५० वी जयंती आहे आणि त्याला आदरांजली वाहण्यासाठी गुगलने खास डुडल बनवले आहे. स्कॉटलंडमधल्या ग्लासगोव्हमध्ये त्यांचा जन्म झाला. चार्ल्स यांना रसायनशास्त्रात फारच रुची होती. वेगवेगळे प्रयोग करण्यात ते नेहमीच व्यस्त असायचे. नाफ्ता हा रबरमध्ये सहजासहजी विरघळतो. यापासून एक पदार्थ तयार होतो जो जलरोधक असतो हे चार्ल्स यांना एका प्रयोगादरम्यान कळले. त्यांनी दोन कपड्यांच्यामध्ये हे मिश्रण लावले हा कपडा पाण्यात भिजला तरी त्यातून पाणी आत झिरपणार नाही हे चार्ल्स यांना कळले. जलरोधक कापड बनवण्याचे पेटंट त्यांना १८२३ मध्ये मिळाले. पण त्याकाळात त्यांच्यावर आरोपही झाले हा शोध रे तर त्यांचा नसून सर्जन जेम्स सिम यांच्याकडून त्याने ही कल्पना घेतली असेही आरोप झाले.

 

चार्ल्स यांचा हा शोध खूपच महत्त्वाचा मानला जातो. कारण पावसात स्कॉट नागरिकांचे बाहेर फिरताना हाल व्हायचे. छत्री होती पण ती असून नसल्यासारखीच. तसे जलरोधक कपडे होते पण त्यांचे वजनच खूप असायचे आणि त्याला कुबट वासही यायचा त्यामुळे अर्थात चार्ल्सने शोधलेल्या या नवीन रेनकोटला प्रसिद्धी लाभली नाही तर नवलच म्हणावे लागेल.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin